Friday, 9 August 2019

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुलक्षणा... तुला नुकतच दत्तक घेण्यात आले असल्याचे आनंद महेंद्रू, पॅपॉन, शेखर सुमन, इस्माईल दरबार यांनी जाहीर केले आहे.





असे क्वचित होत असते की, २८ वर्षीय मुलांनी तिच्या वाढदिवसाचा केक कापला आणि तिचे अश्रू फुटले. पण ती सुलक्षना होती, जी २८ वर्षात पहिल्यांदाच तिचा वाढदिवस साजरा करत होती.  ८० लोकांचे कुटुंब आणि मित्र परिवार या आनंदात सामील होऊन तिला शुभेच्छा देत आहेत हे पाहून नक्कीच तुमच्याही डोळ्यात आनंदाश्रू येतीलच ना. आणि ८० कुटुंबाचे सदस्य ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल ना?  ज्या सदस्यांचा संदर्भ देतोय  ती अनाथ मुलं आहेत जी त्यांच्यासारख्या एकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आली होती. 

ह्या आनंदात महेंद्रू, शेखर सुमन, पॅपॉन, इस्माईल दरबार, श्रीकांत भारतीय सारखे सेलिब्रिटी सामील होते  आणि हे सगळं शक्य झालं सारिका गगन आणि गगन महोत्रा ह्या सुंदर जोडीमुळे. 

सुलक्षणा तिचा आनंद व्यक्त करत म्हणाली, "मी खरच भारावून गेले आहे. माझ्या बहिणीने मला अगदी लहानपणीच फक्त एक चिट्ठी हाती देऊन सोडून दिल होतं ज्यावर माझं नावे आणि जन्मतारीख होती. तेव्हापासून ते आतापर्यंत २८ वर्षांत माझा हा पहिलाच वाढदिवस साजरा झाला आहे! "

सुलक्षणाने आज तिच्यासारख्या अनेक अनाथांना आपले जीवन समर्पित केले आहे. ज्यांच्यावर अनाथाश्रमातून बाहेर पडल्यावर रस्त्यावर भीक मागण्याइतकी वेळ आली त्यांनाही ती मदतीचा हात देते. तिला अशी अपेक्षा कधीच नव्हती की ती  २८ वर्षांची झाल्यावर तिला सारिका आणि गगन महोत्रा सारखे गोड जोडपे दत्तक घेतील आणि आयुष्यभर तिचा हात धरून ठेवण्याचं  वचन देतील. 

"हे आश्चर्यकारक वाटते." सुलक्षणा आपले अश्रू रोखू शकले नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने असे काही तरी नक्की करावे, हे या जोडप्याने उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. सारिका आणि गगन महोत्रा सांगतात की, “आम्ही तेच केले जे आम्हाला वाटले. ह्या कृतीत असामान्य काहीही नाही. आम्ही फक्त आपल्या अंतःकरणाला अनुसरुन हा निर्णय घेतला.” 

चित्रपट निर्माते-उद्योजक आनंद महेंद्रू यांनी न केवळ अंधेरी येथे 'चंपक' स्टुडिओ उघडला तर आपल्या मित्रांना ही ह्या आनंदात सामील होऊन अनेक अनाथ मुलांना सामील होण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यांचे स्वागत केले. "ह्या पेक्षा सुंदर काहीच नाही कारण अशाच पुढाकारांमुळे ह्या जंगलाचे रूपांतर उबदार प्रेमळ मायेच्या घरांमध्ये होऊ शकते. असे आणखी काही उपक्रम झाले पाहिजेत आणि आपण सर्वांनी मनापासून त्यात सहभागी झाले पाहिजे." असे भाऊक आनंद महेंद्रू म्हणाले. शेखर सुमन, पॅपॉन, श्रीकांत भारतीय आणि इस्माईल दरबार संभाषणादरम्यान उत्साही सेल्फी घेत ऐक्यात सहमत होते.

No comments:

Post a Comment