Wednesday, 7 August 2019

अभिनेता रजनीश दुग्गल, नाझिया हुसैन, पूजा बिष्ट, दिग्दर्शक राजीव एस रुईया व निर्माता रविंदर जीत दारिया यांनी मुश्किल चित्रपटाचे जोशमध्ये केले प्रोमोशन


अभिनेता रजनीश दुग्गल, नाझिया हुसैन, पूजा बिष्ट, दिग्दर्शक राजीव एस रुईया व निर्माता रविंदर जीत दारिया अंधेरी पश्चिम येथील बॉम्बे कॉकटेल बार मध्ये आयोजित मुश्किल - फियर बिहाइंड यु च्या प्रमोशनल इव्हेंट मध्ये दिसून आले. हा चित्रपट  ९ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. 


ह्या चित्रपटाचे चित्रीकरण मनमोहक अश्या निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे. दिग्दर्शक राजीव एस रुईया आणि  निर्माता रविंदर जीत दारिया यांच्या बिग बॅट फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित 'मुश्किल - फियर बिहाइंड यु' हा चित्रपट चार मित्रांची कथा मांडतो जे एका प्रवेश बंद महालात प्रवेश करतात आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर काय घडते त्यातून ते कसे बाहेर पडतात ती गोष्ट उलगडते. ही कथा वाईटावर चांगल्याचा विजय नेहमीच होतो हे सिद्ध करते.

No comments:

Post a Comment