Sunday, 23 June 2019

असामान्य कर्तृत्वाचा सन्मान सोहळा


अँपल मिशनच्या माध्यमातून निर्माता-दिग्दर्शक डॉ. अनिल काशी मुरारका यांनी  भारत प्रेरणा पुरस्कार आणि शूरवीर अवॉर्ड आयोजित केले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात, सामान्य लोकांच्या असाधारण कामगिरीचे  कौतुक करण्यासाठी कॉर्पोरेट विश्व, चित्रपट आणि दूरदर्शन उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील  नामवंतांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात डॉ. अनिल काशी मुरारका आणि सिद्धार्थ मुरारका यांच्या व्यतिरिक्त मुकेश ऋषि, पूजा बेदी, राजू श्रीवास्तव आणि पत्नी शिखा, आभा सिंह,  शिबानी कश्यप, देवांगी दलाल, मंजू लोढ़ा, राघव ऋषि, प्राची तेहलान, जिनल पंड्या, जितेन लालवानी, शुभ मल्होत्रा, अशोक धामणकर, बॉबी खन्ना यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ. अनिल मुरारका यांचे वडील समाजसेवक काशी मुरारका यांनी त्यांच्या शब्दकौशल्याने  वेगवेगळ्या पुरस्कार विजेत्यांचा यशाची प्रशंसा केली व त्यांचे कौतुक केले.  मुलगा डॉ. अनिल मुरारका यांच्या पुढाकाराने  भारत प्रेरणा अवॉर्ड प्रत्येक वर्षी उत्तरोत्तर उंची गाठत आहे.  "भारत प्रेरणा पुरस्कार आणि शूरवीर अवॉर्ड एकत्रित करण्याचा हा पहिला प्रयोग आहे आणि यापुढे हा उपक्रम आणखी चांगले यश संपादन करेल अशी आशा करतो . मोठ्या संख्येने उपस्थित असणारे मान्यवर आणि सेलिब्रिटीजचे अँपल मिशनच्या वतीने आभार मानतो", असे डॉ. अनिल काशी मुरारका म्हणाले. 




शूरवीर अवॉर्ड्स हा एक अनोखा प्रयोग आहे जो देशातील असाधारण कामगिरी प्राप्त करणाऱ्या सामान्य पुरुष आणि स्त्रियांना सन्मानित करतो. असाधारण कामगिरी करणार्‍या मध्ये भूरसुतु शर्मा, गुलाफशा अंसारी, रेजी थॉमस, पुष्प प्रेया, मुमताज चंद पटेल, रेशमा पठाण, सीमा वाघमोडे, सुफिया शेख आणि केतन चोडव्याय्या यांना  शूरवीर पुरस्कार तर भारत प्रेरणा पुरस्कारासाठी सागर पाटील, दिविन विसारिया, पूजा शाह, करण शाह, विराग शाह, सारिका जैन, शबाना अझीझ, सुशील शिंपी, समीर काकड, दीपक सैनी आणि कमलेश पटेल यांना सन्मानित करण्यात आले.

अश्या उपक्रमाची जितकी प्रशंसा केली जाईल तितकी कमी आहे.

No comments:

Post a Comment